कळंब येथे युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त

पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली..

कळंब येथे युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त

पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली..

इंदापूर प्रतिनिधी –

वालचंदनगर (ता.इंदापूर) कळंब गावच्या हद्दीमध्ये पोलिसांनी सापळा रचून एका युवकाकडून गावठी पिस्तूल जप्त केले. गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सोमवारी (दि.11) नोव्हेंबर रोजी सकाळी 11.15 वा. सुमारास ही कारवाई करण्यात आली.

सिध्दार्थ दादा साळवे (वय 18वर्षे, रा. एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.

वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी 11.15 वा सुमारास कळंब हद्दीत वालचंदनगर नातेपुते रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, हवालदार शैलेश स्वामी,गुलाबराव पाटील,गणेश काटकर,जगदीश चौधर,विक्रमसिंह जाधव,अभिजित कळसकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Articles

Back to top button