हर्षवर्धन पाटील यांच्या पायाखालील वाळू सरकली – बाबासाहेब चौरे
इंदापूरची जनता आता सुज्ञ

हर्षवर्धन पाटील यांच्या पायाखालील वाळू सरकली – बाबासाहेब चवरे
इंदापूरची जनता आता सुज्ञ
इंदापूर प्रतिनिधी –
निवडणुका म्हटल्या की आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे या साऱ्या गोष्टी ठरलेल्याच असतात. चांगल्याला चांगले म्हणणे ही नीतिमत्ता आता विरोधी पक्षाकडे राहिली नाही. माणसाकडे स्वतःचं कर्तृत्व किंवा स्वतःच व्हिजन नसले की विरोधकावर बेछूट आरोप करत राहणे हाच त्यांच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा होऊन जातो.
सध्या इंदापूर तालुक्यात तयार झालेले वातावरण पाहता अपक्ष उमेदवार प्रवीण माने आणि दत्तात्रय भरणे यांच्यातच खरी लढत असल्याचे जनतेचा कल पाहून हर्षवर्धन पाटील यांनी ओळखले आहे त्यातूनच असे बिनबुडाचे आरोप करत पाटील जनतेची दिशाभूल करत आहेत.
इंदापूरची जनता आता सुज्ञ झाली असून आपण ज्यांना यामागे संधी दिली त्यांनी काहीच विकास केला नसल्याने तालुक्यात परिवर्तन घडवण्याचा निर्धार जनतेने केला असून यामुळे प्रवीण माने हे आत्ताच विजयाच्या जवळ पोहोचले आहेत. म्हणूनच हर्षवर्धन पाटील यांच्या पायाखालील वाळू सरकली असून ते अशा पद्धतीने जनतेची दिशाभूल करण्याच्या वल्गना करत आहेत.
हर्षवर्धन पाटलांसारख्या जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीची विधाने करणे हे अतिशय हास्यास्पद असून, पाटलांना आता प्रवीण माने सारख्या नवख्या उमेदवाराची चिंता पडली आहे याचेच ते सूचक आहे.