दादाच्या निधनानंतरही यंत्रणांना शहाणपण नाहीच?सुनेत्रा पवारांच्या विमानात बिघाड; मुंबई एअरपोर्टवर…
मुंबई विमानतळावर 45 मिनिट पवार यांच्यावर थांबण्याची वेळ आली.

दादाच्या निधनानंतरही यंत्रणांना शहाणपण नाहीच?सुनेत्रा पवारांच्या विमानात बिघाड; मुंबई एअरपोर्टवर…
मुंबई विमानतळावर 45 मिनिट पवार यांच्यावर थांबण्याची वेळ आली.
मुंबई;प्रतिनिधि
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण होण्याआधीच उपमुख्यमंत्र्यांना पुरवली जाणारी विमानसेवा आजही किती चिंताजनक आहे याची झलक दाखवणारी घटना समोर आली आहे.
दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विमानामध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच विमानात बिघाड असल्याचं समोर आल्यानंतर सुनेत्रा पवारांना 45 मिनिटं विमानतळावर वाट पहावी लागली.
एनडीएच्या बैठकीसाठी जात होत्या
मिळालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार 9 जून रोजी दिल्लीला जाताना सीएमआर कंपनींच्या विमानामधे तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीला जाण्यापूर्वी सुनेत्रा पवारांना मुंबई विमानतळावर 45 मिनिट पवार यांच्यावर थांबण्याची वेळ आली. सुनेत्रा पवार एनडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जात असताना हा प्रकार घडला. दिल्लीला जाताना आणि येताना सीएमआर कंपनीच्या विमानाने सुनेत्रा पवारांनी प्रवास केला.
अजित पवारांच्या अपघातानंतर वाद
28 जानेवारी रोजी बारामती विमानतळावर उतरताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवारांसहीत पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्यालाच नाही तर देशातील राजकीय वर्तुळाला धक्का बसला होता. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी अजित पवार ज्या व्हीएसआर व्हेंचर्स नावाच्या विमान कंपनीने प्रवास करत होते त्या कंपनीवर अनियमितेचे आरोप केले. या विमान कंपनीचं इन्सुरन्स, इंजिन लाइफ, फ्लाइट ऑवर्स अंडर-रेकॉर्डिंग, पायलट ट्रेनिंग नियमभंग, ब्रेथ अॅनालायझर टेस्टिंगमध्ये अनियमितता आणि आर्थिक तसेच राजकीय संबंध असल्याचा आरोप केला होता. लास्ट-मिनिट क्रू बदल आणि इतर तांत्रिक मुद्दे एक्स्ट्रा फ्युअल, अनुसूचित नसलेला प्रवास असे इतरही अनेक मुद्दे रोहित पवारांनी मांडले. रोहित पवार यांनी कंपनीमध्ये एवढे दोष असतानाही उपमुख्यमंत्रीपदावरील महत्त्वाच्या व्यक्तील कसं काय या विमानांनी प्रवास करण्याची परवानगी दिली जाते किंवा ही विमानं अशा महत्त्वाच्या व्यक्तींच्या सेवेत का आहेत असा सवालही उपस्थित केले आहेत.






