स्थानिक

बारामतीतील जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या बारामती एमआयडीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

कामगारांच्या न्याय हक्कांसाठी संघटित लढा उभारणार; बारामतीत पदनियुक्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न

बारामतीतील जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या बारामती एमआयडीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर

कामगारांच्या न्याय हक्कांसाठी संघटित लढा उभारणार; बारामतीत पदनियुक्ती कार्यक्रम उत्साहात संपन्न

बारामती वार्तापत्र 

जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या बारामती एमआयडीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांचा नियुक्ती सोहळा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बारामती येथे उत्साहात पार पडला. संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना गौरव अहिवळे यांनी सांगितले की, कंत्राटी कामगारांवर विविध स्तरांवर अन्याय होत असून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटना सातत्याने लढा देणार आहे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला संघटना स्थापन करण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचा अधिकार दिला असून, कंत्राटी कामगारांची एकजूट करून त्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघ कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या पदनियुक्तीमध्ये शहाजी बाळू कांबळे यांची बारामती एमआयडीसी विभागाध्यक्ष, भारती साबळे व स्वाती गायकवाड यांची उपाध्यक्ष, सरिता सरतापे यांची कार्याध्यक्ष, सुप्रिया खरात यांची सहकार्याध्यक्ष, रेश्मा सावंत यांची संघटक, निलेश काकडे यांची सरचिटणीस आणि ऋतिक मिसाळ यांची संपर्कप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रमाला बारामती शहराध्यक्ष आकाश शिंदे, उपाध्यक्ष विशाल जगताप, कार्याध्यक्ष निखिल सरोदे, सहकार्याध्यक्ष अनिकेत धालपे, सरचिटणीस सुरज वाडेकर, महिला शहराध्यक्ष संगीता खरात, महिला उपाध्यक्ष प्रतिभा वाघमारे, महिला कार्याध्यक्ष रुपाली वाडेकर, महिला संघटक अलका बगाडे, महिला सरचिटणीस अनिता पवार, महिला सहकार्याध्यक्ष सुजाता साबळे, महिला सहसंघटक सुमन अहिवळे, तसेच स्वप्निल लोंढे, राहुल सोनवणे, शंकर शिंदे, प्रशांत शेलार, संकेत शिंदे, प्रतिक चव्हाण, नाना बगाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार उपस्थित होते.
कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करत हा पदनियुक्ती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D