क्राईम रिपोर्ट

बारामतीत राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण; चार आरोपी न्यायालयात हजर, बचाव पक्षाचा महत्त्वाचा युक्तिवाद!

‘खरी परिस्थिती समोर आल्याशिवाय आरोपी म्हणता येणार नाही’

बारामतीत राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरण; चार आरोपी न्यायालयात हजर, बचाव पक्षाचा महत्त्वाचा युक्तिवाद!

‘खरी परिस्थिती समोर आल्याशिवाय आरोपी म्हणता येणार नाही’

बारामती वार्तापत्र 

बारामती विमानतळाजवळ १८ ऑक्टोबर रोजी राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात तपासाला वेग आला आहे. या प्रकरणात बारामती तालुका पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून, त्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचा समावेश असल्याची माहिती आहे. तसेच आणखी तीन जणांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणातील चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी आरोपींच्या वतीने ॲड. महेश देवकाते यांनी न्यायालयात बाजू मांडली.

‘खरी परिस्थिती समोर आल्याशिवाय आरोपी म्हणता येणार नाही’

आरोपींच्या भूमिकेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याचा युक्तिवाद करताना ॲड. महेश देवकाते यांनी आरोपींचा या हल्ल्यात काहीही सहभाग नसल्याची बाजू मांडली. आरोपी आणि फिर्यादी यांच्याबाबत गल्लत होत असल्याचा दावाही त्यांनी केला.

काही आरोपी केवळ दुकानात उभे होते, त्यामुळे त्यांना थेट आरोपी ठरवता येणार नाही, असे देवकाते यांनी सांगितले. गोळीबाराबाबतची माहिती आरोपींनी दिलेली नसल्याचाही दावा त्यांनी केला.

पोलीस कोठडी आणि तपासावर लक्ष

प्रकरणातील इतर संशयितांची भूमिका आणि संभाव्य सहआरोपींचा तपास करण्यासाठी पोलिसांना आणखी कोठडी आवश्यक असल्याची बाब न्यायालयीन प्रक्रियेत समोर आली. हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती मिळत नसल्याचा युक्तिवादही ॲड. देवकाते यांनी केल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणात बचाव पक्षाने मांडलेले मुद्दे आणि पोलिसांचा तपास याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे. मात्र, आरोपींबाबतचे दावे हे बचाव पक्षाचे म्हणणे असून, प्रकरणातील दोष किंवा निर्दोषत्व न्यायालयीन प्रक्रियेतूनच निश्चित होईल.

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पुढील तपासातून कोणती माहिती समोर येते आणि उर्वरित संशयितांचा शोध कधी लागतो, याकडे लक्ष लागले आहे.

Back to top button