कृषि उन्नती योजनेअंतर्गत पॉवर टिलरचे वाटप
लाभार्थी रामचंद्र दादु भोसले यांनी समाधान व्यक्त केले.

कृषि उन्नती योजनेअंतर्गत पॉवर टिलरचे वाटप
लाभार्थी रामचंद्र दादु भोसले यांनी समाधान व्यक्त केले.
बारामती वार्तापत्र
कृषि उन्नती योजनेंतर्गत कृषि यांत्रिकीकरण उपअभियान सन 2021-22 या आर्थिक वर्षातील श्री. रामचंद्र दादु भोसले, रा. निरावागज यांना महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल मध्ये अर्ज एक योजना अनेक मधुन लॉटरी पध्दतीने पॉवरटिलर करीता निवड झाली होती.
या पॉवर टिलरची मोका तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी , पुणे ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषि अधिकारी , बारामती बालाजी ताटे, तालुका कृषि अधिकारी, बारामती दत्तात्रय पडवळ, मंडळ कृषि अधिकारी, बारामती चंद्रकांत मासाळ, कृषि सहाय्यक, निरावागज ज्योती गाढवे उपस्थित होते.
अर्ज एक योजना अनेक या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्रात ऑनलाईन अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे , आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी केले. तसेच लाभार्थी रामचंद्र दादु भोसले यांनी समाधान व्यक्त केले.