कै , गं , भि , देशपांडे विद्यालयात स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण
सामूहिक संविधान वाचन घेण्यात आले.

कै , गं , भि , देशपांडे विद्यालयात स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण
सामूहिक संविधान वाचन घेण्यात आले.
बारामती वार्तापत्र
बारामतीये थील मएसोचे कै.ग.भि.देशपांडे माध्य. विद्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण माजी सैनिक मानसिंग जाधव यांच्या हस्ते करण्यात आले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे नियामक मंडळ सदस्य व शाला समिती अध्यक्ष अजय पुरोहित होते.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे, शाळा समन्वयक पुरुषोत्तम कुलकर्णी , उपमुख्याद्यापिका सविता हिले, प्राथमिक विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका प्रतिभा कदम , पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका अनिता तावरे , पर्यवेक्षक शेखर जाधव , ज्येष्ठ शिक्षक शशिकांत खताळ हेही उपस्थित होते.याप्रसंगी एनसीसी, आरएसपी , स्काऊट व गाईड पथकांनी पाहुण्यांना मानवंदना दिली.
सामूहिक संविधान वाचन घेण्यात आले.
विद्यालयाचे कलाशिक्षक अमित पाटील यांनी तीन हजार विद्यार्थ्यांसमवेत ‘वंद्य वंदे मातरम’ या देशभक्तीपर गीताचे गायन केले .
आर्मी, नेव्ही यासारख्या संरक्षण क्षेत्रात जाण्याची संधी असल्याने विद्यार्थ्यांनी यात भरती व्हावे तसेच.
देशसेवेसाठी काय करावे, कसे वागावे, आर्थिक शिस्त ही महत्वाची आहे .देश सेवेसाठी ज्यांच्या मनगटामध्ये ताकत आहे त्यांनी सैन्यामध्ये भरती व्हावे असे आवाहन प्रमुख अतिथी मानसिंग जाधव यांनी केले .
सर्वांनी परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरण पूरक भारतासाठी प्रयत्न केले पाहिजे.
विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून दिवसभरातील घटना आपल्या कुटुंबासमवेत मांडल्या पाहिजेत. शोध घेणे हा माणसाचा मूळ स्वभाव स्वतःचा स्वभाव नेहमी नवनवीन गोष्टी आत्मसात करणे आणि आपल्या वर्तनात बदल करणे असा असावा. भारत ही आपली माता आहे.
विद्यार्थ्यांनी वाहतुकीचे नियम पर्यावरण यासाठी प्रयत्न करावेत आणि नवनिर्मितीसाठी त्याचा वापर करावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय पुरोहित यांनी सर्वांना केले .
कार्यक्रमात स्वातंत्र्यदिनी वाढदिवस असणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
विद्यालयाच्या क्रीडा विभागाने या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले . विद्यालयाचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी तसेच सर्व सल्लागार समिती सदस्य यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी स्वानंद परिवार, प्रशालेचे आजी-माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.
प्रास्ताविक मोहिनी देशपांडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली कोकरे यांनी केले.