‘छत्रपती’ चा गळीत हंगाम सुरू राज्यमंत्री भरणे यांचे हस्ते मोळी पुजन कार्यक्रमाच्या वेळेवरून सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण
भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम आज कारखान्याच्या कार्यस्थळावर वने, जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.

‘छत्रपती’ चा गळीत हंगाम सुरू राज्यमंत्री भरणे यांचे हस्ते मोळी पुजन कार्यक्रमाच्या वेळेवरून सभासदांमध्ये संभ्रमाचे वातावरण
भवानीनगर येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम आज कारखान्याच्या कार्यस्थळावर वने, जलसंपदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न झाला.
बारामती वार्तापत्र
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या वर्षी गळीत हंगामात बारा लाख टन उस असून हा सर्व ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे . सभासदांनी आपला ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे,असे आवाहन राज्यमंत्री दत्तात्रय (मामा ) भरणे यांनी केले. यावेळी वजन काटाचे पूजन करण्यात आले
कारखान्याचे गव्हान पूजन सकाळी 11 वाजता ठरलेले असताना अचानक यामध्ये नऊ वाजता कार्यक्रम घेण्याचे जाहीर करण्यात आले त्यामुळे पृथ्वीराज जाचक यांनी कार्यक्रम नियोजित वेळेत कार्यक्रम घ्यावा असे सांगितले त्यावर दोन्हीकडून मध्य साधत सकाळी दहाची वेळ ठरविण्यात आली मात्र या प्रकारामुळे सभासदांमध्ये उलटसुलट चर्चा चालु झाली होती मात्र राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक हे दोघेही साडेदहा वाजता उपस्थित राहिले व त्यांनी कारखान्याचे गव्हान पूजन व मोळी पूजन केले
या कार्यक्रमास कारखान्याचे चेअरमन प्रशांत काटे , व्हा. चेअरमन अमोल पाटील ,साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ,माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील ,संचालक ॲड रणजीत निंबाळकर ,डॉ दीपक निंबाळकर, राजेंद्र गावडे , सर्जेराव जामदार, अनील बागल, संतोष ढवाण पाटील, नारायण कोळेकर ,, दत्तात्रय सपकळ , रसीक सरक ,गणेश झगडे , भाऊसो सपकळ, शेतकरी कृती समितीचे शिवाजी निंबाळकर विशाल निंबाळकर ,कार्यकारी संचालक जीएम अनारसे, वर्क्स मॅनेजर निकम साहेब, सिव्हिल इंजिनियर तानाजी खराडे यांच्यासह सर्व संचालक, सभासद, अधीकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते