शैक्षणिक

विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय,बारामती माजी विद्यार्थी स्नेहमेळावा २०२६ उत्साहात संपन्न

माजी विद्यार्थी, यांनी आभारप्रदर्शन केले.

विद्या प्रतिष्ठान अभियांत्रिकी महाविद्यालय,बारामती माजी विद्यार्थी स्नेहमेळावा २०२६ उत्साहात संपन्न

माजी विद्यार्थी, यांनी आभारप्रदर्शन केले.

बारामती वार्तापत्र 

विद्या प्रतिष्ठानच्या कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, बारामती (VPKBIET) यांच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमेळावा पुणे येथील पुदुमजी हॉल, एमसीसीआयए येथे उत्साहात पार पडला.

या स्नेहमेळाव्याचा मुख्य उद्देश माजी विद्यार्थी व संस्थेमधील नाते अधिक दृढ करणे तसेच प्लेसमेंट, इंटर्नशिप, मार्गदर्शन आणि उद्योग–शैक्षणिक सहकार्याच्या संधी निर्माण करणे हा होता.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता नोंदणी व अनौपचारिक संवादाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. व्ही. सी. तोडकरी यांनी प्रभावीपणे केले. उद्घाटनपर भाषणात संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे यांनी संस्थेच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद केले.

प्लेसमेंट, इंटर्नशिप, उद्योग सहकार्य व शैक्षणिक समृद्धीसाठी माजी विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी ज्योती कुलकर्णी यांनी संस्थेच्या प्लेसमेंट उपक्रमांची माहिती देत माजी विद्यार्थ्यांना भरती प्रक्रिया, इंटर्नशिप, मार्गदर्शन व तज्ज्ञ व्याख्यानांमध्ये सक्रिय सहभागाचे आवाहन केले. यावेळी एच. पी. बोराटे यांनी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले.

माजी विद्यार्थी संवाद सत्रात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक अनुभवांची व आठवणींची देवाणघेवाण केली. हा सत्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघटनेची औपचारिक स्थापना करण्यात आली. यामध्ये प्रसाद घोंगडे – अध्यक्ष, प्रवीण काशीद – उपाध्यक्ष
यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. पी. आर. चित्रागर, अधिष्ठाता – माजी विद्यार्थी, यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले.

हा स्नेहमेळावा यशस्वीरीत्या पार पडून माजी विद्यार्थी व संस्था यांच्यातील सहकार्य अधिक बळकट झाले असून, भविष्यातील प्लेसमेंट, इंटर्नशिप व मार्गदर्शन उपक्रमांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे

Check Also
Close
Back to top button