
जनकल्याण समितीच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
70 पुरूष व 12 महिलांनी रक्तदान केले
बारामती वार्तापत्र
रविवारी जनकल्याण समिती (महाराष्ट्र प्रांत) बारामती जिल्हा यांच्यातर्फे मएसो चे कै. ग. भि. देशपांडे विद्यालय, बारामती येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्तपेढी पुणे यांनी सहकार्य केले. या रक्तदान शिबिरात बारामती तालुक्यातील 70 पुरूष व 12 महिलांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांची रक्तगट, हिमोग्लोबीन, रक्तदाब याची तपासणी करण्यात आली.सर्व रक्तदात्यांना गौरव पत्र देण्यात आले.
याप्रसंगी डाॅ. दिलीप लोंढे, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. कांबळे व मएसो विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी गावडे यांच्या हस्ते भारतमाता पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी जनकल्याण समितीचे विनोद इजारे, बापू थिटे, प्रसाद गायकवाड, संदीप देशपांडे, प्रशांत पांडकर, संदीप भोसले, संजय जेवरे, दादा वणवे, विराज सस्ते, डाॅ. यति कोकरे,राजेंद्र ठोंबरे उपस्थित होते.