क्रीडा

जनहित प्रतिष्ठान विद्यालयाची कु. स्नेहा रणवरे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत तृतीय…

७२ किलो वजनी गटात

जनहित प्रतिष्ठान विद्यालयाची कु. स्नेहा रणवरे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत तृतीय…

७२ किलो वजनी गटात

बारामती वार्तापत्र 

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्ती अकॅडमी लोणी देवकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २५/०९/२०२५ रोजी जिल्हास्तरीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या यामध्ये पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांचा समावेश होता.

जिल्हास्तरीय आंतरशालेय कुस्ती स्पर्धेमध्ये जनहित प्रतिष्ठान विद्यालयाची कु. स्नेहा महेश रणवरे हिने ७२ किलो वजनी गटात अतिशय उत्तम कामगिरी करून तृतीय क्रमांक मिळवला.

ह्या खेळाडूला NIS कोच क्रीडा शिक्षक श्री. सचिन सुभाष नाळे यांचे मार्गदर्शन मिळाले.

कु. स्नेहा रणवरे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Check Also
Close
Back to top button