जवान कै. विजय पोंदकुले यांच्या कुटूंबियांना गावकर्यांतर्फे जवळ जवळ दोन लाखांची मदत.
गावचे सुपुत्र असलेले डॉ अतुल पिसाळ व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत सर्वांना आर्थिक मदतीचे आवाहन

जवान कै. विजय पोंदकुले यांच्या कुटूंबियांना गावकर्यांतर्फे जवळ जवळ दोन लाखांची मदत.
गावचे सुपुत्र असलेले डॉ अतुल पिसाळ व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत सर्वांना आर्थिक मदतीचे आवाहन
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथील जवान विजय पोंद्कुले हे शहीद झाले त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता गावकऱ्यांनी त्यांच्या अंत्यविधीच्या अगोदरच सोशल मीडियावर केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि गावकर्यांनी आपल्या देशाला सेवा करणाऱ्या या शहीद जवान प्रती कृतज्ञता व्यक्त करताना तब्बल दोन लाखांचा निधी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे बँकेमध्ये अनामत रक्कम म्हणून सुपूर्द केला.
देशवासीयांना मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल किती अपार प्रेम असते, याचे उदाहरण नुकतेच बारामती तील जळगाव येथे पाहायला मिळाले. येथील जवान विजय पोंद्कुले यांना नुकतेच काश्मीर मध्ये देशसेवा करताना वीर मरण आले. ही बातमी गावात समजताच पूर्ण गावात शोककळा पसरली.
शहीद पोंद्कुले यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून अख्खे कुटुंब फक्त एका छोट्या खोलीत निवारा करते. त्यांच्या पाठीमागे त्यांची आई वडील पत्नी मुलगा व मुलगी असा परिवार. त्यामुळे यावर ती फक्त हळहळ व्यक्त न करता पुर्ण परिवारासाठी काहीतरी ठोस उपाय करण्याचे सर्व गावकऱ्यांनी व सोशल मीडियावरील मित्रांनी मिळून ठरवले. त्यामध्ये गावचे सुपुत्र असलेले डॉ अतुल पिसाळ व त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेत सर्वांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. रातोरात या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद भेटत गावकऱ्यांनी तब्बल एक लाख 91 हजार एवढी प्रचंड रक्कम गोळा करून त्याचे फिक्स डिपॉझिट वीर शहीद यांची पत्नी व मुलीच्या नावाने केले. तसेच डॉक्टर अतुल पिसाळ यांनी त्या कुटुंबियांसाठी आजीवन मोफत उपचार करण्याचे जाहीर केले आहे.
देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सीमेवरती उभ्या असलेल्या जवानांविषयी ही कृतज्ञतेची पोचपावती आहे असे मत जवानांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले.