जैन सोशल ग्रुप बारामतीतर्फे मूकबधिर मुलांना आमरस भोजन
भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्त जैन सोशल ग्रुप बारामती तर्फे विविध उपक्रम

जैन सोशल ग्रुप बारामतीतर्फे मूकबधिर मुलांना आमरस भोजन
भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक निमित्त जैन सोशल ग्रुप बारामती तर्फे विविध उपक्रम.
बारामती वार्तापत्र
24 वे तीर्थंकर भगवान श्री महावीर स्वामी यांच्या जन्मकल्याणक निमित्त जैन सोशल ग्रुप बारामतीच्या तर्फे निवासी मूकबधिर विद्यालय, कऱ्हावागज,बारामती येथील मुलांना आमरस पुरी याचे काम जेवण देण्यात आले.
निवासी मूकबधिर विद्यालयातील जवळपास 50 मुले आणि मुली यांना या माध्यमातून अन्नदानाचा कार्यक्रम करण्यात आला. यामध्ये मुलांना आमरस पुरी, मिठाई आणि फळे असे लज्जतदार जेवण देण्यात आले. जैन सोशल ग्रुपच्या मेंबर्सनी त्यांच्या स्वतःच्या हाताने या सर्व मुला मुलींना आमरस खाऊ घातला.
सर्व मुला मुलींनी आवडीने हे जेवण खाऊन जेवण मस्त असलेले हातवारे करून सर्वांचे आभार मानले.
सर्व मुलं मुली एका लाईनीत बसून जेवले त्यानंतर सर्व तिथली साफसफाई केली आणि परत सगळं व्यवस्थित जागेवर ठेवलं ही त्यांची शिस्त बघून सर्व मेंबर्सनी त्यांना शाबासकी दिली.
त्याचप्रमाणे ही श्री महावीर जन्म कल्याणाचे निमित्त साधून स्वप्निल मुथा व निखिल मुथा यांच्या पुढाकाराने प्राण्यांसाठी पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली.
या उपक्रमासाठी जैन सोशल ग्रुप बारामतीचे अध्यक्ष चेतन व्होरा तसेच विपुलशेठू डूडू,महेश खाबे, अक्षय दोशी ,महेश ओसवाल, राजकुमार दोशी, ललित टाटिया, राजू भंडारी ,पंकज गदिया, मनोज धोका, संतोष मेहता, राहुल पहाडे, महावीर शहा ,प्रबोध शहा, प्रफुल गादिया, स्वप्नील मुथा, सौ शिल्पा व्होरा, सौ नितल मुथा, सौ.स्वाती मेहता, सौ सीमा टाटिया,सौ तनुजा शहा, सौ सपना खाबे या सर्वांनी योगदान दिले.