इंदापूर

इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

▫️बड्या ठेकेदारांना पोसण्यासाठी बांधकाम विभागाचे कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष ▫️

इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

▫️बड्या ठेकेदारांना पोसण्यासाठी बांधकाम विभागाचे कोर्टाच्या आदेशाकडे दुर्लक्ष ▫️

▫️राष्ट्रवादीच्या गटनेत्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खात्यावरच केला हल्लाबोल▫️

इंदापूर : प्रतिनिधी

इंदापूर नगरपरिषद हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या ई-निविदा मागवण्याच्या प्रक्रियेवर इंदापूर नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते गजानन गवळी यांनी आक्षेप घेत सदरील खात्याचे मंत्री व तालुक्याचे लोकप्रतिनिधी असणाऱ्या राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खात्याच्या कार्यपद्धतीवर टीका करत घरचा आहेर दिला असून याबाबत इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

इंदापूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही महिन्यांपूर्वी इंदापूर शहरातील विकास कामांकरिता साखळी पद्धतीने ई-निवदा काढण्यात आल्या होत्या.मात्र सदरील साखळी पध्दतीने काढलेल्या ई-निविदांमुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप गवळी यांनी केला आहे.दिलेल्या तक्रारीत गवळी यांनी असे म्हंटले आहे की,कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे छोटे-मोठे
कॉन्ट्रॅक्टरांवर उपासमारीची वेळ आली आहे.साखळी पध्दतीने ई-निविदा काढल्यामुळे ते देशोधडीला लागले आहेत.त्यामुळे कोणत्याही कामांच्या निवदा/ई-निविदा साखळी पध्दतीने न घेता इथून पुढे त्या स्वतंत्र पध्दतीने घ्याव्यात व छोट्या-मोट्या कॉन्ट्रॅक्टरांना न्याय द्यावा.

Related Articles

Back to top button