दादा मला वाचवा; बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर कोयता-तलवारीचा धाक
मेडिकल चालकाला कथित खंडणीसाठी धमकी?”

दादा मला वाचवा; बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर कोयता-तलवारीचा धाक
मेडिकल चालकाला कथित खंडणीसाठी धमकी?”
बारामती वार्तापत्र
शहरातील देवकाते हॉस्पिटल शेजारी असलेल्या समर्थ हेल्थ केअर अँड मेडिको येथे रविवारी मध्यरात्रीनंतर कथित खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. तक्रारीनुसार, रात्री सुमारे १.३० ते २ वाजण्याच्या दरम्यान काही तरुण आणि अल्पवयीन मुले मेडिकलसमोर आले. त्यांच्या हातात तलवार व कोयत्यासारखी धारदार शस्त्रे होती.
मेडिकल चालकाला पैशांची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपी करण्यात आला आहे.या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ही घटना बारामती शहर पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर घडली आहे.
पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस गस्त देतात कोठे?
बारामती शहरात कोयता, तलवार, खंडणी आणि दहशतीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची भावना नागरिकांच्यात आहे. काही नागरिकांनी गुन्हेगारी प्रवृत्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली असून रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ, सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आणि व्यापारी सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करण्याऐवजी प्रकरणे मिटवणीवर भर दिला जात आहे.
गुन्हेगार संधी साधू Ø रात्रीची गस्त अपुरी?
पोलीस स्टेशनपासून अल्प अंतरावर धारदार शस्त्रे घेऊन तरुण फिरत असतील तर गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Ø सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई होते का?
वारंवार गुन्हे करणाऱ्या संशयितांवर तडीपार, प्रतिबंधात्मक नोटीस किंवा इतर कारवाई प्रभावीपणे झाली का, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
Ø अल्पवयीन मुलांचा वापर वाढला?
गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यास सामाजिक व पोलिस पातळीवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
Ø व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न?
२४ ास सुरू असणारी मेडिकल, पेट्रोल पंप, हॉटेल्स यांच्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था आहे का?
Ø गुन्हेगारीविरोधी मोहिमा प्रभावी?
कोयता, तलवार, खंडणी, धमकी यांसारख्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्यास पोलिसांनी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.






