क्राईम रिपोर्ट
बारामतीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दखल नितीन वाईन शॉपसमोर सार्वजनिक मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
वाईन शॉपसमोरच रंगत होता मद्यपानाचा अड्डा पोलिसांचा अचानक छापा

बारामतीतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीची दखल नितीन वाईन शॉपसमोर सार्वजनिक मद्यपान करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
वाईन शॉपसमोरच रंगत होता मद्यपानाचा अड्डा पोलिसांचा अचानक छापा
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील साठे नगर, कसबा परिसरातील नितीन वाईन शॉपसमोर सार्वजनिक ठिकाणी मद्यपान होत असल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या होत्या.
वाईन शॉपमधूनच मद्य खरेदी करून काही व्यक्ती दुकानासमोर व परिसरात मद्यपान करत असल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची बाब समोर आली होती. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी घटनास्थळी भेट देत संबंधितांवर कारवाई केली आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरोधात पुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.