क्राईम रिपोर्ट
बारामती शहरातील अवैध हातभट्ट्यांवर पोलिसांचा धडक मोठी कारवाई
पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त मोहीम हातभट्ट्या उद्ध्वस्त

बारामती शहरातील अवैध हातभट्ट्यांवर पोलिसांचा धडक मोठी कारवाई
पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त मोहीम हातभट्ट्या उद्ध्वस्त
बारामती वार्तापत्र
बारामती शहर आणि परिसरातील अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त कारवाई करत अवैध हातभट्ट्यांवर छापे टाकण्यात आले.
या कारवाईत मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू आणि दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून पुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.