माळेगाव बु
माळेगाव कारखाना निवडणुकीतून एका बलाढ्य उमेदवाराचा पत्ता कट होणार..?
चेअरमन पदाचा दावेदार होऊ शकतो

माळेगाव कारखाना निवडणुकीतून एका बलाढ्य उमेदवाराचा पत्ता कट होणार..?
चेअरमन पदाचा दावेदार होऊ शकतो
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून. इच्छुकांनी आपल्याला उमेदवारी मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांकडे तसेच माजी चेअरमन चंदरराव तावरे यांकडे शर्ती चे प्रयत्न चालवले आहे.
अशातच माळेगाव पंचक्रोशीतून एका बलाढ्य माजी संचालकाची उमेदवारी अजित पवार यांचेकडून रद्द झाली असल्याची चर्चा परिसरामध्ये होत आहे.
सदरील उमेदवार हा चेअरमन पदाचा दावेदार होऊ शकतो तसेच राष्ट्रवादी च्या अंतर्गत प्रस्थापित संचालकांच्या नाराजितुनच उमेदवारी कट होत असल्याची चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात होत आहे.!
अजित पवार यांकडून उमेदवारांची यादी प्रसारित होयला हेच कारण असल्याचे बोलले जात आहे.!