दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार,आमदाराचा भाऊ अडकणार?
एक तरुणी जखमी झाली आहे.

दौंडच्या न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार,आमदाराचा भाऊ अडकणार?
एक तरुणी जखमी झाली आहे.
बारामती वार्तापत्र
दौंडच्या कलाकेंद्रात काल रात्री गोळीबार झाल्याची चर्चा असल्याची माहिती समोर आली आहे. चौफुला इथून पुढे न्यू अंबिका कला केंद्रात गाणी वाजवण्यावरून दोन गटात वाद झाला. त्यामध्ये गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील चौफुलाच्या पुढे न्यू अंबिका कलाकेंद्र आहे. कलाकेंद्रात काल रात्री गोळीबार झाल्याची घटना घडली असल्याची चर्चा आहे. कलाकेंद्रात दोन गटात वादावादी झाली. लावणी वाजवायची कि डीजेवरची गाणी वाजवायची यावरून वाद झाला होता. त्यावेळी गोळीबार झाल्याची माहिती समोर आली असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे. पोलिसांना याबाबत विचारले असता त्यांनी सीसीटीव्ही तपासणी सुरु असल्याचे सांगितले आहे. तसेच गोळीबार झाला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ती व्यक्ती एका आमदाराच्या जवळची असल्याने हे प्रकरण झाकले जात असल्याचं आरोपही होऊ लागला आहे. २४ तास उलटूनही पोलिसांना या प्रकरणाची काहीच माहिती मिळाली नाहीये. कला केंद्राच्या मालकांना विचारले असता त्यांनी गोळीबार झाला नसल्याचे सांगितले आहे. आमच्याकडे हा प्रकार हा घडला नाही. पोलिसांनी चौकशी करावी असेही त्या म्हणाल्या आहेत. जर तसं काही आढळल्यास कारवाई करावी असंही न्यू अंबिका कला केंद्राचे मालक म्हणाले आहेत.
प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात
दौंडचा गोळीबाराचा तपास पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. २४ तास होऊनही काहीच समोर न आल्याने हे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. पुणे जिल्ह्यातील एका सत्ताधारी आमदाराच्या भावाने गोळीबार केल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे या विषयावरून राजकारण रंगणार, असं चित्र दिसतंय.