दौंड : कुरकुंभ एमआयडीसीला पुन्हा एकदा आगीने वेढले.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आगीचे सत्र सुरूच असल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दौंड : कुरकुंभ एमआयडीसीला पुन्हा एकदा आगीने वेढले.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आगीचे सत्र सुरूच असल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दौंड ; बारामती वार्तापत्र
याचा व्हिडीओ येथे पहा अथवा बाारामती वाार्तापत्र फेसबुक पेज वर पाहू शकता.
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सिलेट केमिकल कंपनीत गुरूवारी ( ता. 1 ) पहाटे दोनच्या सुमारास अचानक आग लागल्याने केमिकल ड्रमचे स्फोट व आगीचे मोठे लोट तयार झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शिवशक्ती ऑक्सिलेट केमिकल कंपनीमध्ये इतर कंपन्यांचे प्रक्रियेतून शिल्लक राहिले केमिकल वेगवेगळे करण्यात येणाऱ्या कंपनीत गुरूवारी ( ता. 1 ) पहाटे अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. आग विझविण्यासाठी औद्योगिक वसाहतीचा व परिसरातील इतर कंपन्यांचे अग्निशामक बंब प्रयत्न चालू होते. आगीत केमिकलने भरलेल्या ड्रमचे वारंवार होणार स्फोट होत होते.
तर आग व धुराचे लोट आकाशात उंच जात असल्याने वीस किलो मिटर अंतरापर्यंत आगीची भयानकता दिसून येत होती . कंपनीच्या परिसरात मोठयाप्रमाणात वेगवेगळया ज्वलनशील केमिकल ड्रमच्या साठयाला आग लागल्याने आग आटोक्यात आण्यास विलंब होत आहे.