इंदापूर

धगधगत्या आगीत घर खाक; अवचर कुटुंबाचा संसार उघड्यावर

अवचर कुटुंबाला मदतीची अपेक्षा

धगधगत्या आगीत घर खाक; अवचर कुटुंबाचा संसार उघड्यावर

अवचर कुटुंबाला मदतीची अपेक्षा

इंदापूर:- बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यातील बेडशिंग गावचे रहिवाशी असलेल्या विष्णू जोतिराम अवचर यांच्या राहत्या घराला रविवारी (४ ऑक्टोबर) पहाटे सव्वा पाचच्या सुमारास अचानक आग लागली. काही कळेपर्यंत सर्वकाही भस्म झाले. पती, पत्नी आणि दोन मुले असलेल्या अवचर कुटुंबाचे आगीमध्ये कपडे, कागदपत्रे, धान्याची पोती, दोन तोळे सोने, भांडी, नवीन घर बांधण्यासाठी काढलेले कर्ज व उसनवारीने आणलेले एकूण एक लाख तीस हजाराच्या रोख रकमेसह अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. विष्णू अवचर यांचा मुलगा पदवीच्या दुसऱ्या वर्षाला असून त्याची फी भरण्यासाठी ही पैसे नसल्याने मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती कुटुंबाला सतावत आहे.

लॉकडाऊनमुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या या शेतकरी कुटुंबाचे घर आगीत भस्मसात झाल्याने होत्याचे नव्हते झाले आहे, संसार उघड्यावर पडला आहे. बाहेर बांधलेली जनावरे आणि अंगातील कपड्यांशिवाय काहीही उरले नाही. आगीचे नेमके कारणही कळू शकले नाही. सध्या दुसऱ्यांनी दिलेल्या डब्यावर जेवणाचा प्रश्न सुटतोय.गावकामगार तलाठी यांनी पंचनामा केला असून चार लाखांचे नुकसान नमूद केले आहे.त्यामुळे शासनाने पंचनामा करुन तुटपुंजी मदत देण्याएवजी बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related Articles

Back to top button