धर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात,उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा
‘जातीधर्मांत तेढ निर्माण करू नका’
धर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात,उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा
‘जातीधर्मांत तेढ निर्माण करू नका’
बारामती वार्तापत्र
सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे. जातीय सलोखा राखावा. सण उत्सवातून एकोपा राहावा, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री सध्या राज्यात व देशामध्ये काही जणांकडून धर्मा-धर्मामध्ये जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. कृपया कोणीही अशा मंडळींच्या नादाला लागू नका.
अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला. कोऱ्हाळे (ता. बारामती) येथील एका कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.
पवार म्हणाले, धर्म, जातीमध्ये तेड करणाऱ्यांच्या राजकिय इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न जो सुरू आहे, त्याला कदापी यश येता कामा नये. जातीय तणाव निर्माण झाला तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याचा खरा फटका गरिबाला बसतो. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. मोठ्या लोकांना याचा फटका बसत नाही. तो घरात बसतो. मात्र दिवसभर काम केल्यावर ज्याच्या घरातील चुल पेटते, अशा लोकांच्यावर त्याचा परिणाम होतो.अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी पवार म्हणाले, राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून विजेचा तुटवडा जाणवत आहे. यासाठी राज्य सरकार परदेशातून कोळसा आयात करत आहे. बाहेरील कोळसा राज्यातील पॉवर पॉईंटला जास्तीच्या प्रमाणात चालत नाही. मात्र परदेशी आणि देशी कोळसा वापरून विजेचे संकट दूर करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पवार पुढे म्हणाले की, राज्यात ३ ते ४ हजार मेगावॉट विजेची मागणी वाढली आहे. विजेची मागणी लक्षात घेता शेजारील राज्यातून वीज विकत घेण्याचा निर्णय झाला आहे.
धरणातील पाणी पाऊस पडेपर्यंत शेतीला राखून ठेवण्यात येणार असून उर्वरित पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाणार आहे. तसेच आपण जी वीज वापरतो त्याचे बिल भरलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.