“नगरपरिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांचा गणरायास निरोप”
गणपती बाप्पा मोरया ...पुढच्या वर्षी लवकर या'

“नगरपरिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांचा गणरायास निरोप”
गणपती बाप्पा मोरया …पुढच्या वर्षी लवकर या’
बारामती वार्तापत्र
गणपती बाप्पा मोरया …पुढच्या वर्षी लवकर या ” च्या जल्लोषात बाप्पाला निरोप देताना ,कंठ दाटून आलेला असतानाच कोरोनाची ही महामारी लवकरात लवकर टळो ,अशी प्रार्थना मनोमन करून शहरातील सर्व गणेशभक्तांनी साशुनयनांनीच गणरायाला निरोप दिला. बारामती शहरातील गणेशभक्तांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून साधेपणाने लाडक्या श्री गणेशाचे विसर्जन केल्याबद्दल आभार !! ज्याप्रमाणे श्री गणेशभक्तांनी आगमनावेळी संयम दाखविला त्याचप्रमाणे विसर्जनावेळीही श्रींचे विसर्जन मर्यादित जल्लोषासह शक्यतो घरच्या घरीच आणि नगरपरिषदेने श्रीगणेश विसर्जनासाठीच खास तयार केलेल्या कृत्रिम जलकुंडांमध्ये केल्याबाबतही अभिनंदन… प्रदूषणमुक्त पर्यावरणाच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील २५ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंभांची आणि खास विसर्जनाकरिता तयार केलेल्या १२ फिरत्या विसर्जन रथांचीदेखील व्यवस्था नगरपालिकेने केलेली होती. शहरामध्ये पूर्ण दिवस सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत एक पथक व दुपारी ३ ते विसर्जन संपेपर्यंत दुसरे पथक अशाप्रकारे २५ ठिकाणी एकूण ५० पथके नेमून दिली होती .त्याठिकाणी कृत्रिम जलकुंड व निर्माल्य कलशांची सोय केलेली होती.
मुख्याधिकारी महेश रोकडे यांनीदेखील सकाळपासून सर्व मूर्ती संकलन केंद्रांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेची पाहणी करून वेळोवेळी सूचना करून नागरिकांशीही संवाद साधला आणि प्रशासनाने केलेल्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले .फिरते रथ घरोघरी जाऊन देखील मूर्ती संकलनाचे काम करीत होत्या .संकलित केलेल्या मूर्ती शहरातील २ विहिरींमध्ये विसर्जित करण्याची सोय केलेली होती .त्याठिकाणीसुद्धा प्रत्येकी २ पथके नेमली होती. त्यांनी दिवसभरामध्ये सकाळी ७ ते मध्यरात्री विसर्जन संपेपर्यंत एकूण ४७५० गणेशमूर्तीचे विधिवत विसर्जन केले. नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी अतिशय सुंदररित्या विसर्जन पार पाडले.त्याबाबत शहरातील सर्व नागरिकांनीदेखील समाधान व्यक्त करून नगरपालिकेच्या नियोजनाचे कौतुक केले नागरिकांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन पुढच्या वर्षी याहीपेक्षा सुंदर नियिजन करू असा मनोदय यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी व्यक्त केला.