माळेगाव कारखाना वायुगळती दुर्घटनेतील एकाचा मृत्यू.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील वायू गळती दुर्घटनेतील एका कामगाराचा मृत्यू झाला.

माळेगाव कारखाना वायुगळती दुर्घटनेतील एकाचा मृत्यू.

माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील वायू गळती दुर्घटनेतील एका कामगाराचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे.बारामती तालुक्यातील माळे गाव साखर कारखान्यात शनिवार दि.(२३)रोजी बारा
कामगारांना अपघात झाला होता. यामधील एक कामगार शिवाजी भोसले
याचा मध्यरात्री आडीच वाजण्याच्या दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती
कारखाना प्रशासनाने दिली. दरम्यान पुणे येथे उपचार घेत असलेले कामगार घनश्याम निंबाळकर याची प्रकृती देखील चिंताजनक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. साफसफाई करत असताना मिथेन गॅस तयार झाल्याने ही घटना घडली. त्यामध्ये कारखान्यातील तेरा कामगार अत्यवस्थ झाले . त्यातील एकाचा मृत्यू झाला असून इतर कामगारांवर बारामती तसेच पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Check Also
Close
Back to top button