क्राईम रिपोर्ट

परवानगी नाकारल्यानंतरही कसबा पेठ गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे कोरोनामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत.

परवानगी नाकारल्यानंतरही कसबा पेठ गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर पुण्यात गुन्हा दाखल

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे कोरोनामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

परवानगी नाकारल्यानंतरही कसबा पेठ गणपती मंदिरासमोर घंटानाद आंदोलन भाजपने केले होते. याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या विरोधात फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • भाजपच्या या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल –

चंद्रकांत पाटील यांच्यासह, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, स्वरदा बापट, नगरसेवक दीपक पोटे, राजेंद्र मानकर, राजेश येनपुरे, हेमंत रासने, गणेश बिडकर यांच्यासह संजय देशमुख, बापू नाईक, निलेश कदम, राजू परदेसी, पुनीत जोशी आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू असतानाही आदेशाचे उल्लंघन करून कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याची खबरदारी न घेता इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे घातक कृत्य केले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 188 269 270, यासह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सन 2005 चे कलम 51 (ब), 37(1) (3) 135 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक रवींद्र दहातोंडे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

  • कसबा गणपती मंदिरासमोर केले होते घंटानाद आंदोलन –
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे धार्मिक स्थळे कोरोनामुळे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. ही धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावीत याकरिता भाजपच्या कसबा मतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घंटानाद आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्यात यावी यासाठी फरासखाना पोलीस ठाण्यात अर्ज केला होता. परंतु, पोलिसांनी कोरोनामुळे परवानगी नाकारली होती. तरीदेखील चंद्रकांत पाटील यांच्यासह महापौर आणि भाजपच्या नगरसेवकांनी कसबा गणपती मंदिरासमोर टाळ्या वाजवून, घंटानाद करून आंदोलन केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!