कौशल्यधारीत शिक्षण पद्धती करिता नवीन शैक्षणिक धोरण पूरक – डॉ. पंडित विद्यासागर
इंदापूर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा

कौशल्यधारीत शिक्षण पद्धती करिता नवीन शैक्षणिक धोरण पूरक – डॉ. पंडित विद्यासागर
– इंदापूर महाविद्यालयात नवीन शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये शाहीर अमर शेख सभागृहामध्ये राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली IQAC विभागाच्या वतीने नवीन शैक्षणिक धोरणावर एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण हे कौशल्यधारीत शिक्षण पद्धती करीता पूरक आहे. विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांनी हे धोरण समजून घेणे आवश्यक आहे .
डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले की ,’ सामाजिक गरजा बदलत असल्यामुळे शैक्षणिक धोरण बदलण्याची आवश्यकता असते .विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी , मूल्य शिक्षणाची जाणीव व जोपासना होण्यासाठी , नवनिर्मितला चालना देण्यासाठी , कृतिशील शिक्षण मूल्यमापन पद्धती , शिक्षकांच्या अध्यापन व अध्ययन पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची आवश्यकता आहे. स्वायत्त महाविद्यालय निर्माण करणे हा या धोरणाचा उद्देश आहे.’
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे अध्यक्षीय भाषणामध्ये म्हणाले की ,’नवीन शैक्षणिक धोरणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे.’
यावेळी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सदाशिव उंबरदंड उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्याम सातार्ले यांनी केले.कला शाखा विभाग प्रमुख डॉ. भिमाजी भोर यांनी आभार मानले.