पोलीस निरीक्षक ‘नामदेवराव शिंदे ‘ यांचा अनोखा फंडा
बारामती शहर पोलिसांचे आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन
पोलीस निरीक्षक ‘नामदेवराव शिंदे ‘ यांचा अनोखा फंडा
बारामती शहर पोलिसांचे आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन
बारामती वार्तापत्र
सरते वर्षाला निरोप आणि येणाऱ्या नवीन वर्षाचा जल्लोष करण्यासाठी सर्व नागरिक विशेषता तरुण मुले ही 31 डिसेंबरच्या संध्याकाळी, रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन स्वागताच्या,जल्लोषाच्या नावाखाली धिंगाना घालत असतात. त्यामुळे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या संकल्पनेतून एक अनोखा उपक्रम बारामतीत राबवला जात आहे.
यामध्ये उद्या म्हणजेच 31 डिसेंबर रोजी नागरिकांना, तरुणांना ‘ दारू नको, दूध पिऊया ‘ या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन दारूपासून दूर राहण्याचा संदेश एका ऑडिओ क्लिप मधून देण्यात आलेला आहे. दारू करते बुद्धिभ्रष्ट ,का करता समाजाचा विनाश, दारु ला समाजातुन कटवा
अशा पद्धतीची ऑडिओ क्लिप करून दारू पासून चार हात दूर राहण्याचे विशेषता तरुणांना आवाहन करण्यात आले आहे.
उदया 31 तारखेला संध्याकाळी पाच ते रात्री साडेदहा वाजेपर्यंत या उपक्रमात जे तरुण किंवा अन्य सहभागी होतील त्यांना बारामती शहर पोलीस स्टेशन च्या वतीने मोफत मसाला दूध वाटप केले जाणार आहे.
बारामती शहरातील सर्व तरुण मंडळे, अशोकनगर, मेन रोड, राजे ग्रुप, महाविर पथ, देसाई इस्टेट , शारदा नगर, मोरगाव रोड, जामदार वस्ती, आमराई, तावरे बंगला, तीन हत्ती चौक, पाटस रोड, शिवाजी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परीसर,काटेवाडी, पिंपळी, डोर्लेवाडी, मळद, लीमटेक, माळेगाव बु ,गुणवडी या गावातील सर्व नागरिक व तरुण मंडळांनी यामध्ये भाग घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमांमध्ये सामील होणाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मास्कचा वापर करावा 60 वर्षावरील नागरिक आणि दहा वर्षाच्या आतील मुलांनी शक्यतो सुरक्षेच्या आणी आरोग्याच्या कारणास्तव घरीच थांबावे अशा पद्धतीचे आवाहनही करण्यात आले आहे.
कोरोनाच्या काळात गर्दी कमी व्हावी, पोलीस प्रशासनावरील ताण कमी व्हावा ,आपत्कालीन परिस्थितीमध्ये गणपती मंडळातील कार्यकर्ते पोलीस मित्र म्हणून मदतीस यावेत व नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने, विनाअपघात व्हावी ,तरुण पिढी व्यसनाधीन होऊ नये म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उपक्रम वेळापूर, मंगळवेढा, जयसिंगपूर ,हुपरी ,पन्हाळगड येथे नामदेवराव शिंदे यांनी गेल्या वर्षी आयोजित केला होता. तेथेही उद्या या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.
आता शहरातील आणि तालुक्यातील काही तळीरामांनी मात्र या उपक्रमाचा लाभ घेवुन नवीन वर्षाचा संकल्प करावा व या उपक्रमाचे चळवळीत रूपांतर करावे एवढीच माफक अपेक्षा.