प्रभाग क्रमांक 17 च्या विकास कामांना सुरुवात
नगरसेविका मयूरी शिंदे यांच्या माध्यमातुन शुभारंभ
प्रभाग क्रमांक 17 च्या विकास कामांना सुरुवात
नगरसेविका मयूरी शिंदे यांच्या माध्यमातुन शुभारंभ
बारामती वार्तापत्र
बारामती नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील अमराई विभागातील माता रमाई भवन, बीएसएनएल ऑफिस समोरील रस्ता, प्रबुद्ध नगर ते पोस्ट ऑफिस कडे जाणारा रस्ता चे डांबरीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्ष पौर्णिमाताई तावरे यांच्या हस्ते झाला.
या रस्त्याची अनेक दिवसापासून दुरवस्था झाली होती. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले होते. स्थानिक लोकांनी रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. नगरसेविका मयुरी शिंदे यांच्या माध्यमातून या रस्त्याचे कामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, उपनगराध्यक्षा तरन्नुम सय्यद, गटनेते सचिन सातव ,उपगट नेत्या सविता ताई जाधव ,बांधकाम सभापती संतोष जगताप ,नगरसेविका अनिता जगताप ,माजी नगरसेवक बाळासाहेब मागाडे ,अभिजीत चव्हाण ,विजय खरात ,भानुदास बागाव ,गजानन गायकवाड ,सतीश खुडे, सिकंदर शेख ,बाबा सावंत ,रमेश गायकवाड ,रोहन मागाडे, सुरज शिंदे, कैलास शिंदे, बबन भोसले ,आकाश शिंदे, उमेश शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.