स्थानिक
प्रशासनाच्या वतीने बारामती तहसिल कार्यालयात सद्भावना दिन साजरा
तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने बारामती तहसिल कार्यालयात सद्भावना दिन साजरा
तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
बारामती वार्तापत्र
तहसिल कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला. यावेळी तहसिलदार विजय पाटील यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
“मी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो/करते की, आमच्यामधील वैयक्तिक किंवा सामुहिक स्वरुपाचे सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनियम करुन व संविधानिक मार्गानी सोडवीन,” अशी प्रतिज्ञा यावेळी देण्यात आली.
यावेळी महसूल नायब तहसिलदार महादेव भोसले, निवडणूक नायब तहसिलदार पी.डी. शिंदे, यांच्यासह तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.