प्रश्नमंजुषा स्पर्धेत टेक्निकल चा प्रथम क्रमांक
ही स्पर्धा इ 8 वी ते 10 वी या गटामध्ये घेण्यात आली
प्रश्नमंजुषा स्पर्धेत टेक्निकल चा प्रथम क्रमांक
ही स्पर्धा इ 8 वी ते 10 वी या गटामध्ये घेण्यात आली
बारामती वार्तापत्र
बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयाने प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे.देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 84 व्या वाढदिवसानिमित्त विद्याप्रतिष्टान च्या मराठी माध्यमिक विद्यालयात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये प्रादेशिक,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चालुघडामोडी बरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान,इतिहास,भूगोल,या विषयांमधील सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता.
ही स्पर्धा इ 8 वी ते 10 वी या गटामध्ये घेण्यात आली होती.या स्पर्धेत टेक्निकल विद्यालयातील नंदन नलवडे(8वी),हर्षद शिंदे( 9 वी),प्रणव निकम(10 वी) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून 1500रुपये,प्रशस्तीपत्र व विद्यालयाला ट्रॉफी देण्यात आली आहे.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विभागप्रमुख शेख मॅडम व पठाण मॅडम यांनी केले.विद्यार्थांच्या या यशाबद्दल त्यांचे व मार्गदर्शक शिक्षक यांचे विद्यालयाचे प्राचार्य श्री कल्याण देवडे यांनी अभिनंदन केले.