कोरोंना विशेष

बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ३३ , कालच्या तुलनेत आज रुग्ण वाढले

शहरी भागात रुग्णसंख्येचा आलेख वाढलेलाच

बारामतीत आज कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ३३ , कालच्या तुलनेत आज रुग्ण वाढले

शहरी भागात रुग्णसंख्येचा आलेख वाढलेलाच

बारामती वार्तापत्र

बारामतीत आज ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

बारामती शहरात २२ आणि बारामती ग्रामीण मध्ये ११ रुग्णसंख्या झालेली आहे.

काल झालेल्या शासकीय rt-pcr नमुन्यामध्ये २१३ नमुन्यामधून एकूण पॉझिटिव्ह १६ रुग्ण आहेत तसेच खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr २४ नमुन्यांपैकी ५ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.तर एंटीजनच्या ३२ नमुन्यांपैकी एकूण १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या ३३ झाली आहे.

बारामतीत काल शासकीय प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणीत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये कोऱ्हाळे बुद्रुक येथील ३८ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ३७ वर्षीय पुरुष, सुपा पानसरे वाडी येथील ५१ वर्षीय पुरुष, शिरवली येथील ४५ वर्षीय पुरुष, मालुसरे वस्ती येथील २५ वर्षीय महिला, पारवडी येथील ४८ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

पणदरे येथील ७२ वर्षीय पुरुष, काटेवाडी येथील ४८ वर्षीय पुरुष, गुणवडी येथील १९ वर्षीय महिला, सूर्यनगरी येथील ३४ वर्षीय पुरुष, बारामती शहरातील ४१ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला, प्रतिज्ञा हॉल येथील ४५ वर्षीय पुरुष, मेडद येथील २९ वर्षीय पुरुष, खंडोबा नगर येथील ६३ वर्षीय पुरुष, तांदूळवाडी येथील ४३ वर्षीय पुरुष, तांबे नगर येथील ४७ वर्षीय महिला कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

बारामती तालुक्यात काल खाजगी प्रयोगशाळेत मंगल लॅबोरेटरी येथे विविध तपासण्यांमध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांमध्ये डोर्लेवाडीतील सावतामाळी मंदिराशेजारील ५२ वर्षीय पुरुष, माळेगाव बुद्रुक विद्यानगर येथील भक्ती बंगला शेजारील ६० वर्षीय महिला, पतंगशहा नगर येथील एचपी गॅस गोडाऊन शेजारील ५३ वर्षीय महिला, समीर पार्क मार्केट यार्ड शेजारी २२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

गुणवडी रोड जाधव कॉम्प्लेक्स मधील २६ वर्षीय पुरुष, गवळी अपार्टमेंट पेट्रोल पंपामागे ४० वर्षे पुरुष, साईगणेशनगर शंतनू गार्डन अपार्टमेंट मधील २२ वर्षीय महिला, ग्रीन पार्क एमआयडीसी येथील ४२ वर्षीय पुरुष, गायकवाड वस्ती फलटण रोड येथील ५० वर्षीय पुरुष, येथील ५४ वर्षीय पुरुष, शिवदत्त अपार्टमेंट महावीर भवन शेजारी ७५ वर्षीय पुरुष, वडगाव निंबाळकर ढोले वस्ती येथील ५१ वर्षीय पुरुष, पणदरे येथील ५९ वर्षीय पुरुष आढळून आले आहेत.

बारामतीतील आज पर्यंत एकूण रुग्ण संख्या ६८५३ तर एकूण बरे झालेले रुग्ण ६३६० एकूण मृत्यू १४६.

तुम्ही काळजी घ्या ,अनावश्यक गर्दी टाळा ,सॅनिटायझर ,मास्कचा वापर करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button