बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना खुशखबर! रेपो लिंक्ड दरात 0.10% ची कपात, EMI होणार स्वस्त

नवीन दर आजपासून म्हणजेच 15 मार्च 2021 पासून लागू होतील.

बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना खुशखबर! रेपो लिंक्ड दरात 0.10% ची कपात, EMI होणार स्वस्त

गृहकर्ज, वाहन कर्जे किंवा वैयक्तिक कर्ज घेणार्‍या ग्राहकांवर असलेल्या कर्जावरील व्याजाचा बोजा कमी होणार आहे.

बारामती वार्तापत्र रिपोर्ट

देशातील तिसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाने  आपल्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलंय. बँक ऑफ बडोदानं रेपो लिंक्ड लेन्डिंग रेट  बेसिस पॉईंट म्हणजेच 0.10 टक्क्यांनी कमी केलेत. नवीन दर आजपासून म्हणजेच 15 मार्च 2021 पासून लागू होतील. या कपातीनंतर टक्क्यांवरून 6.75 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्जे किंवा वैयक्तिक कर्ज घेणार्‍या ग्राहकांवर असलेल्या कर्जावरील व्याजाचा बोजा कमी होणार आहे.

सर्व किरकोळ कर्ज उत्पादनांना त्याचा फायदा होणार

बाह्य बेंचमार्क रेपो लिंक्ड रेटमधील कपातीबरोबर बँकेची सर्व किरकोळ कर्ज आपोआप समायोजित केली जातील. गृह कर्ज तारण कर्ज वाहन कर्ज शिक्षण कर्ज वैयक्तिक कर्ज आणि इतर सर्व किरकोळ कर्ज उत्पादनांना त्याचा फायदा होईल.

कर्जाचे व्याजदर इतके कमी झाले

बँकेने जारी केलेल्या माहितीनुसार, बीआरएलएलआर कपात केल्यानंतर गृह कर्जावरील व्याज 6.75 टक्के आणि वाहन कर्जावर 7 टक्क्यांपर्यंत कमी होईल. त्याचबरोबर दुसर्‍या तारण कर्जावर 7.95 टक्के आणि शिक्षण कर्जावर 6.75 टक्के कर आकारला जाईल.

‘या’ बँकांनी व्याजदरही केले कमी

त्याआधी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक  कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी  यांनी कर्जाच्या व्याजदरात कपात केली होती.

SBI गृह कर्ज स्वस्त, व्याज दर 6.70% पासून सुरू

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी एसबीआयने सध्या गृह कर्ज स्वस्त केलं होतं. गृहकर्ज दरामध्ये 6.70 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली होती. आता एसबीआयमधील गृह कर्जाचा दर 6.70 टक्क्यांपासून सुरू झालाय. ही ऑफर मर्यादित कालावधीची आहे. या व्याजदराचा फक्त 31 मार्चपर्यंत लाभ घेता येणार आहे.

आता कोणत्या बँकेकडे किती व्याजदर?

सध्या सर्वात कमी व्याजदर कोटक महिंद्रा बँकेत असून, गृहकर्ज 6..65 टक्के दराने मिळत आहे. त्याचवेळी एसबीआयमधून 6.70 टक्के दराने कर्ज मिळत आहे आणि एसबीआय बऱ्याच सुविधा देत आहे. एसबीआयने प्रक्रिया शुल्कही माफ केले आहे. त्याशिवाय अ‍ॅक्सिस बँक 6.75 टक्के, एचडीएफसी 6.80, आयसीआयसीआय 6.80 टक्के, बँक ऑफ बडोदा 6.85 टक्के आणि एलआयसी 6.90 टक्के कर्ज देत आहेत.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D