बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला 4 लाख 49 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती शहर लुबाडले ; बारामती शहर पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
धमकी देवुन फिर्यादीला वेळोवेळी बॅल्कमेल केले.

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाला 4 लाख 49 हजार रुपये लुबाडले ; बारामती शहर पोलिस ठाण्यात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
धमकी देवुन फिर्यादीला वेळोवेळी बॅल्कमेल केले
बारामती वार्तापत्र
बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन व्यावसायिकाकडून 4 लाख 49 हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना उघडकीस आली आहे.
हि घटना 13 ऑगस्ट 2024 ते दिनांक 17 मार्च 2025 या दरम्यान बारामती येथे घडली आहे.
याप्रकरणी 39 वर्षीय पुरुषाने बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात 38 वर्षीय महिलेवर 308(2),308(3),351(2),351(3), नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून बारामती परिसरात राहतात. तर आरोपी महिला शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. आरोपी महिलेने 10/07/2024 ते 17/03/2025 रोजी वारंवार बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करते अशी धमकी देवुन फिर्यादीला वेळोवेळी बॅल्कमेल केले.
दरम्यान, खंडणीची मागणी करुन रोख रक्कम 2 लाख 81 हजार 600 रुपये व 1 लाख 68 हजार रुपयाचे डायमंडचे मंगळसुत्र असे खंडणी रुपाने 4 लाख 49 हजार रुपये घेतले आहेत. म्हणुन आरोपी महिलेविरुध्द शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.