बारामती तालुक्यातील ‘माळेगाव’च्या कामगारांमध्ये पगारवाढ विरोधात प्रचंड असंतोष
कामगारांच्या पद व श्रेणीनुसार पगारवाढ देण्यात यावी.

बारामती तालुक्यातील ‘माळेगाव’च्या कामगारांमध्ये पगारवाढ विरोधात प्रचंड असंतोष
कामगारांच्या पद व श्रेणीनुसार पगारवाढ देण्यात यावी.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या काही कामगारांना व अधिकार्यांना संचालक मंडळाने दिलेल्या पगारवाढीविरोधात कामगारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
आम्हाला देखील पगारवाढ हवी, यासाठी कारखान्यातील कामगारांनी कार्यकारी संचालक अशोक पाटील यांना निवेदन देऊन याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास सोमवारी (दि. 17) काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
माळेगाव कारखाना प्रशासनाने काही अधिकारी तसेच कामगारांना पगारवाढ दिली असल्याचे समोर येताच संबंधित पगारवाढ ही बेकायदेशीर असून, नियमबाह्य असल्याचे मत कामगारांच्या एका गटाने व्यक्त करत या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.
याबाबत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेतला नाही, तर आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करणार असल्याचे नमूद केले आहे. एकूणच माळेगाव कारखाना प्रशासनाने काही अधिकारी आणि कामगारांना दिलेली पगारवाढ प्रशासनाची डोकेदुखी बनली आहे. त्यामुळे संचालक मंडळ याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.
कोणवरही अन्याय नको
माळेगाव कारखाना प्रशासनाने काही ठरावीक कामगारांना व अधिकार्यांना पगार वाढ केली आहे. परंतु कारखान्यातील अनेक कामगार या पगारवाढीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे कामगारांच्या पद व श्रेणीनुसार पगारवाढ देण्यात यावी. यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी कष्टकरी शेतकरी समितीने केली आहे.
– विलास सस्ते, अध्यक्ष, बारामती तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनाशेतकरी सभासदांना एफआरपीचे पैसे एकरकमी न देता दोन टप्प्यांत दिले. असे असताना शेतकरी बांधवांना पैसे देण्यास प्रशासन हात आखडता घेत आहे. कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता काही कामगारांना व अधिकार्यांना पगारवाढ दिली जात आहे. कारखाना प्रशासनाने कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा. – राजेंद्र शिवाजीराव तावरे, अध्यक्ष, बारामती तालुका साखर कामगार सभामाळेगाव कारखान्याच्या कामगारांची हुद्देवारी व बढती मागील अनेक दिवसांपासून रखडली होती. तथापि सत्ताधारी संचालक मंडळाने अधिकारी आणि कामगारांना हुद्देवारी आणि बढती देऊन योग्य तो निर्णय घेतला आहे. अशावेळी दिलेली पगारवाढ ज्या कामगारांना मान्य नसेल त्यांनी टोकाची भूमिका न घेता कारखाना प्रशासनाशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढावा.