बापरे!बारामती तालुक्यातील पणदरे येथे इलेक्ट्रिक स्कुटीने अचानक घेतला पेट,स्कुटी आगीत जळून खाक
सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
बापरे! बारामती तालुक्यातील पणदरे येथे इलेक्ट्रिक स्कुटीने अचानक घेतला पेट,स्कुटी आगीत जळून खाक
सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
बारामती वार्तापत्र
अलीकडच्या काळात दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याच्या घटनांमुळे सुरक्षेबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.
देशात जागोजागी इलेक्ट्रिक वाहनाना आग लागण्याचे अपघातात समोर येत आहेत, यादरम्यान बुधवारी (दि.११) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान बारामती तालुक्यातील पणदरे मध्ये एका इलेक्ट्रिक स्कूटरला अचानक आग लागली. या घटनेत आजूबाजूच्या लोकांनी वेळीच आग आटोक्यात आणण्यास मदत केल्याने वाहनाचा मालक शशिकांत लक्ष्मण जगताप बचावला.
पवईमाळ पणदरे येथील शशिकांत लक्ष्मण जगताप यांनी दोन महिन्यापूर्वी बारामती येथील एका ई- बाईकच्या शोरूममधून जवळपास ८० हजार रुपये मोजून गाडी खरेदी केली होती. बुधवारी (दि.११) रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान जगताप हे पणदरे बाजारपेठेतील एका हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी गाडी हॉटेलच्या समोर पार्क करून आत गेले. याच दरम्यान गाडीमधून अचानक धूर निघून काही वेळातच गाडीने पेट घेतला, आणि बघता- बघता गाडी जळून खाक झाली.z
याबाबत प्राथमिक माहिती घेतली असता गाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीने पेट घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान याबाबत संबधित शोरूमशी संपर्क साधून घडलेली घटना सांगितली असल्याचे गाडी मालक जगताप यांनी सांगितले.
26 मार्च रोजी पुण्यात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या निळ्या रंगाच्या ओला ए1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याची पहिली घटना घडली होती. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये बॅटरीच्या डब्यातून आग आणि धूर निघताना दिसत आहे.