स्थानिक

बारामतीत नगरपरिषदेचा ‘दिखावा’? गोल पुनवाला गार्डनची दुरवस्था उघड

नगर परिषदेच्या कार्यालयापासून अवघ्या 50 मीटर

बारामतीत नगरपरिषदेचा ‘दिखावा’? गोल पुनवाला गार्डनची दुरवस्था उघड

नगर परिषदेच्या कार्यालयापासून अवघ्या 50 मीटर

बारामती वार्तापत्र 

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोल पुनवाला गार्डनची दुरवस्था समोर येत असून, बारामती नगर परिषदेच्या कारभारावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हे गार्डन नगर परिषदेच्या कार्यालयापासून अवघ्या 50 मीटर अंतरावर असूनही येथील समस्या दुर्लक्षित राहिल्याचे चित्र आहे.

सध्या शाळांच्या परीक्षा संपत आल्याने लहान मुले व पालक मोठ्या संख्येने गार्डनमध्ये येत आहेत. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

याशिवाय गार्डनमधील खेळणी, लहान मुलांसाठी आकर्षक असणारे कारंजे तसेच रेल्वे व इतर साहित्य मोडकळीस आलेले असून, अनेक ठिकाणी तुटलेली व जीर्ण अवस्थेत असल्याने लहान मुलांना दुखापत होण्याचा धोका वाढला आहे. स्वच्छतेचाही अभाव जाणवत असून, एकूणच गार्डनची अवस्था अत्यंत खराब झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नगरपरिषदेकडून विकासकामांचा मोठा गाजावाजा केला जात असला, तरी प्रत्यक्षात अशा मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने “नुसता दिखावा” केला जात असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून सीसीटीव्ही व्यवस्था सुरळीत करावी, गार्डनमधील साहित्य दुरुस्त करावे आणि नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी बारामतीकरांकडून जोर धरत आहे.

Check Also
Close
Back to top button