बायो-सीएनजी निर्मिती प्रकल्पाचा इंदापूर येथे शुभारंभ.
शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा.
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील श्री इंद्रेश्वर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनी ने श्री इंद्रेश्वर रिन्युएबल फ्युएल्स अँड नेचर केअर प्रायव्हेट लिमिटेड व एम सी एल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यात सुमारे १ लक्ष किलो दररोज निर्मिती क्षमतेचा बायो-सीएनजी करण्याचा दावा केला असून प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे, इंदापूर पंचायत समितीच्या सभापती पुष्पा रेडके यांच्या हस्ते हे भूमिपूजन पार पडले.
या प्रकल्पा अंतर्गत इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल शेतातच निर्माण होणार असून शेतकऱ्यांना करार शेती करता येणार आहे,या प्रकल्पा अंतर्गत सुमारे २००० हेक्टर ते १०००० हेक्टर पर्यंत ‘करार शेती करणे शक्य होणार आहे. सदर प्रकल्पामुळे मोठा रोजगार ही
निर्माण होणार आहेत.
सदर च्या शेती करार माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक कुटुंबामध्ये शाश्वत व कायमचे
उत्पन्न मिळवून देण्याचे ध्येय असल्याच्या त्यांच्या दावा असून शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मत पुणे जिल्हा कुस्तीगिर संघाचे सदस्य महेंद्र रेडके यांचे म्हणने आहे.