बारामतीच्या कराटे खेळाडूंनी पुणे जिल्ह्याचे नाव उंचावले
13 मुला मुलींनी भाग घेऊन 18 गोल्ड 4 सिल्वर व 4 ब्राँझ मेडल मिळवून यश

बारामतीतील चिमुकल्यांनी राज्यस्तरीय कराटे स्पेर्धेत मारली बाजी
_उपनगराध्यक्षानी मुलांचे केली कौतुक_
बारामती वार्तापत्र
इचलकरंजी सांगली येथे काल झालेल्या ओपन कराटे राज्यस्तरीय स्पेर्धेत बारामतीचे युनिक स्पोर्ट्स आणि शतकोन कराटे असोसिएशन च्या १२ मुला-मुलींनी सहभाग घेऊन बेस्ट टीम ट्रॉफी व १७ सुवर्ण ४ रौप्य व ३ कास्य असे एकूण २४ पदके जिंकून बारामतीची मान उंचावली आहे
यांचे मार्गदर्शन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेते सेन्सिई अनुराग राजेंद्र देशमुख यांनी केले. स्पेर्धेत यश संपादन केलेल्या विजेत्या खेळाडूचे कौतुक उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी आज केले.
रुद्राणी मगर २ सुवर्ण , पियुष पवार २ सुवर्ण, सृष्टी बर्गे २ सुवर्ण ,पार्थ शेटे २ सुवर्ण , प्रतिन्या कांबळे २ सुवर्ण , अनुष्का वायसे २ सुवर्ण ,रुद्र बर्गे २ सुवर्ण,ओम कारंडे १ सुवर्ण,१ रौप्य ,आदित्य साळुंखे १ सुवर्ण,१ कांस्य, १ प्रसाद काकडे १ सुवर्ण, १ कांस्य,आशुतोष उपाध्याय १ रौप्य,१ कांस्य पदक पटकावले आहेत