क्राईम रिपोर्ट

बारामतीतील लाचखोर पोलीस हवालदार एलसीबी च्या जाळ्यात! एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले

गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी या हवालदाराने लाच मागितली होती.

बारामतीतील लाचखोर पोलीस हवालदार एलसीबी च्या जाळ्यात! एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले

गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी या हवालदाराने लाच मागितली होती.

बारामती वार्तापत्र

बारामती येथे पोलीस हवालदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील नाव वगळण्यासाठी या हवालदाराने 1 लाख 80 हजारांची लाच लाच मागितली होती. दादासाहेब ठोंबरे असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव असून ते बारामती तालुक्यातील पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते. याच पोलीस ठाण्यात ठोंबरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या त्यांना अटक करण्यात आलंय.

तडजोडी नंतर एक लाख दहा हजार देण्याचे ठरले

मिळालेल्या माहितीनुसार एका मारहाण प्रकरणात तक्रारदाराचे नाव होते. हे नाव कमी करण्यासाठी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्याची हमी देत हवालदार दादासाहेब ठोंबरे यांनी तक्रारदाराकडे लाच मागितली. ठोंबरे यांनी तब्बल एक लाख 80 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर तडजोडी अंती एक लाख दहा हजार देण्याचे ठरले. एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याने तसेच लाच देणे चुकीचे असल्यामुळे तक्रारदाराने लाचखोर हवालदाराविरोधात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीनुसार ठोंबरे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.

यापूर्वीही ठोंबरे यांच्यावर लाच घेतल्यामुळे कारवाई

दरम्यान, यापूर्वीही दादासाहेब ठोंबरे यांच्यावर लाच घेतल्यामुळे कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना याच प्रकरणात अटक करण्यात आलंय. या अटकेमुळे ज्या पोलीस ठाण्यात नेमणूक होईल तिथे पैसे लाटण्याचं काम ठोंबरे पोलीस हवालदाराकडून होत असल्याची सध्या चर्चा सुरु आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Back to top button