स्थानिक

बारामतीतील वृध्दाश्रम मधील आदरातिथ्य ने परदेशी पाहुणे भारावले

विविध देशातील परदेशी पाहुण्यांची वृद्धाश्रमाला भेट

बारामतीतील वृध्दाश्रम मधील आदरातिथ्य ने परदेशी पाहुणे भारावले

विविध देशातील परदेशी पाहुण्यांची वृद्धाश्रमाला भेट

बारामती वार्तापत्र

बालपण ,तरुणपण आणि वृद्ध अवस्था प्रत्येकास येत असते परंतु जीवनातील उत्तरार्ध उत्तम जाण्यासाठी वृद्धाश्रम ही गरज होऊन बसली आहे व तांदुळवाडी येथील वृद्धाश्रम मधील आदरतीथ्य मुळे भारावलो असल्याची प्रतिक्रिया विविध देशातील परदेशी पाहुण्यांनी दिली.

मंगळवार दि.४ मार्च रोजी फ्रेंड्स ऑफ मोरल री अरमामेंट संस्थेच्या वतीने आयोजित बारामती दर्शन पर्यटन कार्यक्रमांतर्गत तांदुळवाडी येथील कै रघुनाथ ग्यानबा बोरके ट्रस्ट संचलित वृद्धाश्रम मध्ये कंबोडिया, उरगवे, मेक्सिको, केनिया, आफ्रिका, फ्रान्स, साऊथ सुदान, बुरुंडी आदी देशातील प्रतिनिधी यांनी भेट दिली व येथील कार्याची, उपक्रमाची माहिती घेतली आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या समवेत संवाद साधला आणि गणेश मंदिर,ध्यान धारणा,वाचनालय, उद्यान या ठिकाणी भेट दिली.

या प्रसंगी अध्यक्ष किशोर मेहता, उपाध्यक्ष राजेंद्र बोरावके, सेक्रेटरी फकरुद्दीन कायमखानी, खजिनदार डॉ सुहासिनी सातव, सहखजिनदार
डॉ अजिंक्य राजे निंबाळकर,संचालक अमित बोरावके, योजना देवळे ,सुरेंद्र भोईटे,डॉ आंबर्डेकर , अभय शाह आदी उपस्तीत होते.

वाढत्या आयुर्मान मुळे आमच्या कडील वृद्धाश्रमामध्ये विसराळूपणाची समस्या भारतात सुद्धा जाणवत असल्याचे परदेशी पाहुण्यांनी सांगितली डॉ अजिंक्य राजेनिंबाळकर यांनी वृद्धाश्रम मधील विविध उपक्रमाची माहिती दिली व आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!