बारामतीत अजितदादांच्या जयंतीनिमित्त आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन
मोफत मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया केल्या जाणार...

बारामतीत अजितदादांच्या जयंतीनिमित्त आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन
मोफत मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया केल्या जाणार…
बारामत वार्तापत्र
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून वैदयकीय शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय, नागपूरस्थित महात्मे आयबँक व आय हॉस्पिटल, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वैदयकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी या बाबत माहिती दिली.
19 ते 22 जुलै दरम्यान मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्क्रक्रीया शिबीराचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. महात्मे ट्रस्टचे डॉक्टर्स बारामती पंचक्रोशीतील रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रीया करणार आहेत.
22 व 23 जुलै रोजी प्रसिध्द सर्जन डॉ. मुफ्फजल लकडावाला व त्यांचे सहकारी हर्निया व इतर शस्त्रक्रीया दुर्बिणीदवारे करणार आहेत.
या शिवाय 20 ते 27 जुलै दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालयात गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, स्तन कर्करोगाची महिलांची तपासणी केली जाणार आहे. या व्यतिरिक्त इतरही तपासण्या विनामूल्य केल्या जाणार आहेत. बारामती तालुक्यातील सांगवी व पणदरे येथे 22 जुलै रोजी तर काटेवाडी व मोरगाव येथे 23 जुलै रोजी मोफत सर्वरोगनिदान शिबीर होणार आहे.
बारामती शारदा प्रांगण, जीटीएन कंपनी, पणदरे व सुपे येथे रक्तदान शिबीरांचे आयोजन केले असून या द्वारे रक्तसंकलन केले जाईल.
वरील सर्वच उपक्रम विनामूल्य रुग्णांचे आरोग्य अधिक सुदृढ राहावे या साठी आयोजित केलेले असून रुग्णांची त्याचा लाभ घ्यावा. नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सरकारी रुग्णालयात नावनोंदणीचे आवाहन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






