बारामतीत अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास गुन्हे: मुख्याधिकारी पंकज भुसे
थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता!

बारामतीत अनधिकृत फ्लेक्स, बॅनर लावल्यास गुन्हे: मुख्याधिकारी पंकज भुसे
थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता!
बारामती वार्तापत्र
शहराच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, पदपथ, चौकांमध्ये राजकीय व्यक्तींकडून वाढदिवसांच्या शुभेच्छा, विविध कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे फ्लेक्स, बॅनर लावले जातात.या पुढील काळात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा बारामती नगरपालिकेने दिला आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी पंकज भोसले यांनी नागरिकांसाठी एक आवाहन व्यक्त केल्या असून या आवाहनांमध्ये त्यांनी हा इशारा दिला आहे.
नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा गंभीर इशारा नगरपालिकेने दिला असल्यामुळे या पुढील काळात नगरपालिका हद्दीमध्ये बेकायदा फलकबाजी करणाऱ्यांवर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. या जाहीर आवाहनांमध्ये पंकज भुसे म्हणतात, बारामती नगर परिषद हद्दीमध्ये विद्युत खांब, झाडे इलेक्ट्रिक डीपी, रस्त्यालगतच्या भिंती, शासकीय व खाजगी इमारती यांवर बॅनर, पोस्टर, लीफलेट, जाहिरात बोर्ड , मोठे फ्लेक्स विनापरवानगी लावल्याचे आढळून येत आहे. सदरचे कृत्य हे नियमांचे उल्लंघन करणारे आहे.
याबाबत नगरपरिषदे मार्फत गंभीर दखल घेण्यात आलेली असून, नगरपरिषदेमार्फत महाराष्ट्र सार्वजनिक विद्रुपीकरण कायदा, १९५५ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ याद्वारे संबंधित अनाधिकृत बॅनर, पोस्टर, लीफलेट, जाहिरात बोर्ड, मोठे फ्लेक्स लावणाऱ्यांवर फौजदारी स्वरुपाची कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.