बारामतीत आज खाजगी 8 व शासकीय 13 जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.
काटेवाडी येथील दहा वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाली आहे.
आज दिवसभरात बारामती शहरातील १६ आणि ग्रामीण भागातील ५ असे २१ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.
बारामतीची रुग्णसंख्या 541 झाली आहे.
बारामती वार्तापत्र
काल बारामती मध्ये एकूण ११५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यातील १०२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर बारामती शहरातील अकरा आणि ग्रामीण भागातील दोन अशा तेराजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच आज दिवसभरात २४ जणांची एंटीजेन तपासणी करण्यात आली. त्यातील बारामती शहरातील पांच आणि ग्रामीण भागातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.
शासकीय प्रयोगशाळेतील 13 जणांचे अहवाल प्रयोगशाळेतील पॉझिटीव्ह.
बारामती येथील शंकर भोई तालीम जवळ राहणार्या १ वर्षाच्या मुलास व काटेवाडी येथील १० वर्षाच्या मुलीस हि कोरोनाची लागण झाली आहे.
नीरा गावातील 41 वर्षीय पूरुष, खंडोबा नगर येथिल 55 वर्षिय पुरुष, वडगाव निंबाळकर येथील 21 वर्षीय पुरुष ,खंडोबानगर बारामती येथील 36 वर्षे पुरुष ,फलटण रोड येथील 24 वर्षे पुरुष ,पाटस रोड येथील 32 वर्षीय महिला व 55 वर्षे पुरुष ,शंकर भोई तालीम येथील 23 वर्षीय महिला, कसबा येथील 75 वर्षि पुरुष ,शंकर भाोई तालीम येथील 26 वर्षे पुरुष ,सिद्धांत नगर येथील 33 वर्षीय पुरुष, व काटेवाडी येथील दहा वर्षीय मुलीस कोरोनाची लागण झाली आहे.
खाजगी प्रयोगशाळेतील 8 जणांचे अहवाल प्रयोगशाळेतील पॉझिटीव्ह.
त्यापैकी देसाई इस्टेट येथील दोन जण ,विवेकानंद नगर टीसी कॉलेज जवळील एक जण, अमराई येथील एक जण ,सूर्यनगरी येथील एक जण, वडगाव निंबाळकर येथील एक जण, वानेवाडी कदम वस्ती येथील एक जण व, गुणवडी येथील एक जण ,असे आठ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे आज दिवसभरात बारामती शहरातील १६ आणि ग्रामीण भागातील ५ असे २१ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. तर बारामतीची रुग्णसंख्या आता ५४१ वर गेली आहे.
अशी माहिती वैद्यकीय तालुका अधिकारी डाॅ.मनोज खोमणे यांनी दिली.