इंदापूर

पिटकेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते सत्कार

सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची संचालकांनी दिली ग्वाही

पिटकेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या नवनिर्वाचित संचालकांचा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याहस्ते सत्कार

सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याची संचालकांनी दिली ग्वाही

इंदापूर : प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी प्रणित पिटकेश्वर येथील शिवशंभो ग्राम विकास सहकारी पॅनेलच्या सर्व नवनिर्वाचित संचालकांचा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करवण्यात आला. संचालक निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच त्यांच्या वाटचालीस हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

पिटकेश्वर विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक पदी नामदेवराव किरकत, कैलास येरळकर, पोपट येरळकर, उमेश मोरे, दत्तात्रय बोबडे अजित जाधव, राहुल भिसे, विलास भोंग, गोविंद कांबळे, अशोक जाधव, मधुकर पोळ, आशा किरकत, उषा येरळकर या सर्वांचा संचालक पदी निवड झाल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी सत्कार केला.

हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सोसायटी सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी नुतन संचालक यांनी आपले मत व्यक्त केले.

Check Also
Close
Back to top button