बारामतीत पोलीस वसाहतीच्या बांधकामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते
कामे दर्जेदार आणि वेळेत झाली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांस दिल्या.

बारामतीत पोलीस वसाहतीच्या बांधकामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते
कामे दर्जेदार आणि वेळेत झाली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांस दिल्या.
बारामती वार्तापत्र
पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजकुमार लोहिया म्हणाले, ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भावाबाबत दुर्लक्ष होता कामा नये. ज्येष्ठ नागरिक आणि कोमॉबिर्ड रुग्ण (सहव्याधी) यांना लसीकरण करण्यावर भर देण्यात यावा.
बारामती पोलीस वसाहत, नूतन इमारत पायाभरणी समारंभ संपन्न बारामती येथील पोलीस वसाहत नूतन इमारत बांधकामाचा पायाभरणी समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि कामांचा तपशील जाणून घेतला.
उपमुख्यमंत्री यांनी केली बारामती तालुक्यातील विकास कामांची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती तालुका फळ रोपवाटिकेच्या इमारतीचे बांधकाम, रस्त्याचे काम व परिसर, गुणवडी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात येत असलेले वसतीगृह व परकाळे बंगला येथील कॅनॉलच्या भिंतीच्या कामाची पाहणी केली. कामे दर्जेदार आणि वेळेत झाली पाहिजेत, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांस दिल्या.
त्यावेळी उपमुखमंत्री बोलत होते. बैठकीला पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देखमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षण पुणे विभाग राहूल पाटील, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, उपविभागीय कृषि अधिकारी बालाजी ताटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमने, रुई रुग्णालयाचे डॉ. सुनिल दराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.