शैक्षणिक

बारामतीत शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वी संपन्न

भविष्यातही अशा कौशल्य विकास कार्यक्रमांचे नियमित आयोजन

बारामतीत शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवरील कौशल्य विकास प्रशिक्षण यशस्वी संपन्न

भविष्यातही अशा कौशल्य विकास कार्यक्रमांचे नियमित आयोजन

बारामती वार्तापत्र 

विद्या प्रतिष्ठानच्या शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स येथे AI-Driven Skill Development Program for Teachers/Staff या एक आठवड्याच्या निवासी कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत यशस्वी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणात विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्राध्यापक व कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले.

हा कार्यक्रम व्हीपीकेबीआयईटी, बारामती येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभाग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे प्राचार्य डॉ. एस. बी. लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सी. बी. नायक आणि ई&टीसी विभागप्रमुख डॉ. जे. एस. रांगोळे यांच्या सहकार्याने करण्यात आले.

या कौशल्य विकास कार्यक्रमासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य खत्री असोसिएट्स, बारामती यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून उपलब्ध करून देण्यात आले. यासाठी संस्थेचे स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे माजी विद्यार्थी अभियंता कार्तिक खत्री यांचे विशेष योगदान लाभले.

प्रशिक्षणामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची मूलभूत संकल्पना, शिक्षणातील AI चा प्रभावी वापर, जबाबदार व नैतिक AI, अध्यापन नियोजन, AI आधारित मूल्यमापन, डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती तसेच अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी विविध आधुनिक AI साधनांचा प्रत्यक्ष वापर करून प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी ChatGPT, Gemini, Perplexity, NotebookLM, Magic School AI, Canva AI, Gamma, Julius AI, Runway ML, InVideo AI आदी अत्याधुनिक AI साधनांचा वापर करून अभ्यासक्रम नियोजन, प्रश्नपत्रिका तयार करणे, रुब्रिक्स विकसित करणे, सादरीकरणे, व्हिडिओ निर्मिती, संशोधन आणि विद्यार्थीकेंद्रित अध्यापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी अनुपम क्षीरसागर, जान्हवी जुवळे, सोमनाथ आंबुळे, राहुल कुलकर्णी, अदिती यादव, दिनेश करंदीकर आणि अभिषेक चंदनखेडे यांनी संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. एन. टी. सूर्यवंशी व सौ. वर्षा सुरवसे यांनी यशस्वीरीत्या केले. समारोपप्रसंगी सहभागी शिक्षकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अध्यापन अधिक नाविन्यपूर्ण, परिणामकारक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांच्या डिजिटल कौशल्यात लक्षणीय वाढ होऊन उच्च शिक्षणात AI चा प्रभावी वापर करण्यासाठी नवी दिशा मिळाल्याची भावना सहभागी शिक्षकांनी व्यक्त केली.

विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्त मंडळ व व्यवस्थापन हे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षणामध्ये प्रभावी वापर व्हावा, शिक्षक व विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित व्हावीत आणि उद्योगाभिमुख शिक्षणाला चालना मिळावी या उद्देशाने अशा नाविन्यपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमांना सातत्याने प्रोत्साहन व पाठबळ देत आहेत.

शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून भविष्यातही अशा कौशल्य विकास कार्यक्रमांचे नियमित आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Back to top button