बारामती मध्ये सॉफ्ट स्किल ची कार्यशाळा संपन्न
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कृतीतून (activities), समूह चर्चा

बारामती मध्ये सॉफ्ट स्किल ची कार्यशाळा संपन्न
विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कृतीतून (activities), समूह चर्चा
बारामती वार्तापत्र
२६ जुलै २०२५: व्ही. पी. के. बी. आय. ई. टी. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी विभागामार्फत ( CESA ), बी.ई. संगणक शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण सत्राचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्य, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, टीमवर्क, आणि मुलाखत कौशल्य यासारख्या महत्वाच्या सॉफ्ट स्किल्सचा विकास करणे हे होते. या सत्रात विद्यार्थ्यांना प्राध्यापक ओमी पिरजादे या तज्ञ प्रशिक्षकाकडून मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कृतीतून (activities), समूह चर्चा, आणि प्रात्यक्षिक सत्रांद्वारे सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व समजून घेतले. प्रशिक्षकांनी प्रत्यक्ष उदाहरणांद्वारे विविध संप्रेषण व वर्तन कौशल्यांची माहिती दिली.
प्रशिक्षण सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव सांगितले व या सत्रामुळे त्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे सांगितले. विभागप्रमुख प्रा. अरविंद जगताप आणि समन्वयक प्रा. व्यंकटेश रामपूरकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन उत्तमरीत्या पार पाडले.
या सत्रामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, भविष्यातील प्लेसमेंट प्रक्रियेसाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत प्राचार्य सुधीर लांडे यांनी व्यक्त केले.