खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज इंदापूर मध्ये १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून इंदापूर शहरास करोडो रुपयांचा भरघोस निधी मंजूर
इंदापूर : प्रतिनिधी
बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार,उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे यांच्या हस्ते आज (दि.१७) इंदापूर शहरात १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन संपन्न होणार आहे. सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर हे असणार आहेत.
इंदापूर शहरातील आय.टी.आय इमारतीच्या नवीन वर्ग खोल्या,इंदापूर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष सेतू कार्यालय तसेच शहरातील विविध चौकातील सुशोभीकरण व इंदापूर शहरात अंतर्गत पथ दिवे बसविणे त्याचबरोबर इतर विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन याप्रसंगी संपन्न होणार आहे.
सदरील कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा उमा इंगुले, शहर युवक अध्यक्ष इम्रान शेख यांसह जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्येकर्ते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ५ वाजता इंदापूर तहसील कचेरी येथून होणार आहे.