बारामती ग्रामीण पोलिसांच्या मध्यस्थीने उजनी पाणी प्रश्नाचा वाद तात्पुरता निवळला, शरद पवारांच्या घरासमोरचे आंदोलन मागे.
आमचा पालकमंत्री भरणे यांच्यावर विश्वास नाही.

बारामती ग्रामीण पोलिसांच्या मध्यस्थीने उजनी पाणी प्रश्नाचा वाद तात्पुरता निवळला, शरद पवारांच्या घरासमोरचे आंदोलन मागे.
आमचा पालकमंत्री भरणे यांच्यावर विश्वास नाही.
बारामती वार्तापत्र
कैफियत मांडण्यासाठी आलो…
खासदार पवार यांच्या निवासस्थानी खर्डा-भाकर आंदोलन करत कैफियत मांडण्यासाठी आम्ही आलो. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी निर्णय रद्द केल्याचे सांगितले असले तरी शासकीय अध्यादेश निघालेला नाही. उजनीच्या पाण्याचे यापूर्वीच वाटप झाले आहे. त्यामुळे पाणी शिल्लक नसताना इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा भरणे यांचा निर्णय दुर्दैवी आहे. त्यासंबंधी खासदार पवार यांच्याकडे कैफियत मांडण्यासाठी आलो होतो. आमचा पालकमंत्री भरणे यांच्यावर विश्वास नाही. ते सोलापूरचे पालक मंत्री आहेत. तळे राखील तो पाणी चाखील हे जरी खरे असले तरी भरणे यांनी मात्र तळेच पळविण्याचा प्रयत्न केला आहे. खा. पवार हे सोलापूरच्या शेतकऱ्यांना निश्चित न्याय देतील. प्रसंगी न्यायालयीन लढाई आम्ही लढू, असे आंदोलक नागेश वनकळसे यांनी सांगितले.
या आंदोलनासाठी २५ ते ३० आंदोलक येणार होते, परंतु त्यातील काहींना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी रात्रीच स्थानबद्ध केले. वनकळसे व पवार यांनी गनिमी कावा करत दुचाकीवरून बारामती गाठली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश ढवाण यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत खा.शरद पवार यांचे कार्य अधिकारी सतीश राऊत यांच्याशी बोलणे करून दिले. राऊत यांच्यामार्फत खासदार पवार यांना निवेदन पाठविण्यात आले. उजनीच्या पाण्याचा प्रश्न चिघळला आहे. इंदापूरचे दत्तात्रय भरणे हे सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यांनी उजनीचे पाणी पळविल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
उजनी च्या पाण्याकरिता हे आंदोलन केले होते असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले व आम्ही तात्पुरत्या स्वरूपाचे हे आंदोलन आत्ताच स्थगित करित आहोत असे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले.