क्राईम रिपोर्ट

बारामती तालुक्यातील कटफळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली झोकून देत व्यक्तीची आत्महत्या

मृत व्यक्ती फलटण तालुक्यातील

बारामती तालुक्यातील कटफळ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली झोकून देत व्यक्तीची आत्महत्या

मृत व्यक्ती फलटण तालुक्यातील

बारामती वार्तापत्र

बारामती एमआयडीसी परिसरातील कटफळ रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी एक धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.दादासाहेब पांडुरंग गावडे (रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी ताब्यात घेण्यात आला.या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, घटनेमागील परिस्थिती आणि इतर सर्व बाबींचा सखोल तपास पोलीस करत आहेत.

Back to top button